Big Breaking; गुजरात मध्ये ISIS चे धागेदोरे; महिलेसह चार संशयितांना अटक…

0

 

पोरबंदर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

ISIS संदर्भात गुजरातमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. गुजरात एटीएसने पोरबंदरमध्ये दहशतवादी संघटन ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणात एका विदेशी नागरिकासहित चार जणांना अटक करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1667438419038044162?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1667438419038044162%7Ctwgr%5E7f35dfd056f55c9e650d08cdbaa34471512f2e18%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.saamtv.com%2Fnational-international%2Fgujrat-ats-busted-isis-module-in-porbandar-arrested-vvg94

 

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात एटीएसने दहशतवादी संघटन ISIS च्या चार संशयितांना अटक केली आहे. चौघे फरार होण्याच्या तयारीत असताना त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. त्यासोबतच गुजरात एटीएस आणखी एका संशयित आरोपीचा शोध घेत असल्याचे वृत्त आहे.

एटीएसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या चौघांचा दहशतवादी संघटनेशी संबध होता. गुजरात एटीएसने शनिवारी गुजरातच्या पोरबंदरमध्ये एका विदेशी नागरिकासहित चौघांना अटक केली. एटीएसचं विशेष पथक गेल्या काही दिवसांपासून पोरबंदर येथे सक्रिय होतं. दरम्यान अटक करण्यात चौघांचे संबंध आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी आहे. एटीएसने ही कारवाई डीआयजी दीपेन भद्रन यांच्या नेतृत्वात केली. भद्रन देखील अन्य अधिकाऱ्यांसोबत पोरबंदर येथे होते. संबंधित ४ जणांना अटक करण्याच्या कारवाईत डीआयडी दीपन भद्रन, एसपी सुनील जोशी, डीवायएसपी केके पटेल, डीवायएसपी शंकर चौधरीसहित अन्य अधिकारी देखील होते.

या अटकेनंतर अजून काही मोठे धागेदोरे याबाब्तिक ATS च्या हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या कारवाईचे महत्व फार असल्याचे म्हटले जात आहे.

 

मध्य प्रदेशमध्येही तीन संशयित अटकेत…

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमध्ये दहशतवाद्यांशी संबंधित तीन संशयितांना अटक केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रेणने यावेळी एका दहशतवाद्याचा दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता.

राष्ट्रीय तपात यंत्रणा आणि मध्य प्रदेश एटीएसच्या मदतीने हे मॉड्यूल उध्वस्त केलं. या अभियानांतर्गत जबलपूरमधील १३ जागेवर छापा टाकला होता. या दौऱ्यादरम्यान तीन संशयितांना अटक केली. सैयद ममूर अली, मोहम्मद आदिल खान आणि मोहम्मद शाहिद असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.