राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन…

0

 

बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राज्यपाल रमेश बैस यांनी आज शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. तत्पूर्वी राज्यपाल रमेश बैस यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मंदिर प्रशासनातर्फे औक्षवन करून स्वागत करण्यात आले. बैस यांनी सुरुवातीला समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर श्रींच्या गादीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात मंदिराला मिळालेली देणगी व मंदिरातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि समाजपयोगी विकासकामांची माहिती घेतली. मंदिर प्रशासनातर्फे निळकंठ पाटील यांनी राज्यपाल रमेश बैस यांचा सत्कार केला.

यावेळी आमदार आकाश फुंडकर, विभागीय आयुक्त निधी पांण्डेय, जिल्हाधिकारी डॉ. ह.पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.