Browsing Category

गुन्हे वार्ता

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क अज्ञात वाहनाच्या धडकेत शहरातील सिंधी काॅलनी परिसरातील एक २१ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. ८ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद…

अयोध्या नगरात घरफोडी ; ५० हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड, लॅपटॉप आणि मोबाईल असा एकुण ४९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना अयोध्या नगरात उघडकीस आली आहे. . याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…

जळगावात महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क ४३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी ८ मार्च रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अमळनेरात घरफोडी ; दीड लाखांचा ऐवज लांबविला

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क बंद घर फोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने व महत्वाची कागदपत्रे असा एकुण १ लाख ५२ हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना अमळनेर शहरातील भगवा चौकयेथे उघड झाली आहे. याप्रकरणी…

मुलाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला ४८ तासांत अटक

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापुरातून एक अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेला अपत्यप्राप्ती होत नव्हती. या कारणाने तिने एका सहा वर्षाच्या मुलाचे मंदिरातून अपहरण केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 48 तासात या…

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना सुनावली दोन वर्षांची शिक्षा

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्यातरी राज्याच्या राजकारणातून मोती बातमी समोर येत आहे. सर्वात प्रचलित नाव आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या विरोधात सत्र न्यायालयाने निर्णय दिला आहे. आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने…

दुधाचे दुकान फोडून साडेसात हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क दूध डेअरी फोडून दुकानातील साडेसात हजाराची रोकड आणि मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मेहरुणमधील महादेव मंदिराजवळ मंगळवार ७ मार्च रोजी सकाळी ७.३० उघडकीस आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा…

एरंडोल येथे मोटारसायकल चोरीप्रकरणी संशयितासोबत २ पोलिसांना अटक

एरंडोल , लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथील तिन मोटार सायकल चोरी प्रकरणी एरंडोल पोलिसांनी एका संशयित आरोपी सोबत दोन संशयित पोलिसांना अटक केली आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनवरून मिळालेल्या माहिती नुसार दि.१०/०७/२०२० रोजी रात्री ११ ते…

वन खात्याची धडक कारवाई : अवैध डिंकासह मोटारसायकल जप्त

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क बोरखेडा-मारूळ बारी रस्त्यावर वन खात्याच्या पथकाने धडक कारवाई करत अवैध डिंकासह मोटारसायकल जप्त केली आहे. तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बोरखेडा मारूळ बारी रस्त्यावर पुर्व वन विभागाने सापळा…

साकळी येथील जि.प.मराठी मुलींच्या शाळेत अज्ञातांकडून चोरी

शालेय मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; अपूर्ण बांधकामामुळे चोरीच्या घटना मनवेल ता.यावल : लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत वर्गाचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना दि.६…

फिल्मी स्टाईलने चालत्या मालगाडीवर चढून कोळसा चोरीच्या प्रकरणात वाढ

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिपनगर औष्णीक विद्युत प्रकल्पात दररोज शेकडो टन कोळशाची मागणी असल्याने गेली कित्तेक वर्षापासुन दररोज वरणगाव, फुलगाव मार्गे रेल्वेने कोळसा आणला जात आहे. मात्र फुलगावमधील काही चोरट्यांनी रेल्वेने येणारा कोळसा…

जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरमधून बॅटरी, डिझेल चोरी !

स्कार्पियो वाहनासह मुद्देमाल हस्तगत ; भडगाव पोलिसांची कारवाई भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील निंभोरा शिवारात जियो कंपनीच्या टॉवर मधून बॅटरी, व डिझेल चोरी करून फरार होण्याच्या मार्गावर असलेले चोरट्यांच्या भडगाव पोलिस स्टेशन…

अनोळखी महिला पुरुषाने केले लहान मुलाचे अपहरण ; घटना सीसीटीव्हीत कैद

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा मंदिरातून अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना समोर आली असून हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आयुष नावाच्या मुलाचा पोलिस कसून तपास करीत आहेत.…

अन्नातून विषबाधा झाल्यामुळे बारावीच्या विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून बारावीची परीक्षा  देणाऱ्या एका विद्यार्थिनीचा अहमदनगरमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.राज्यात सध्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षेची पूर्ण तयारी करुन…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात 3 जण जागीच ठार

छत्रपती संभाजीनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क ट्रक आणि कारच्या या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये पती,…

माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह इतरांना दिलासा

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांच्या अपात्रतेला त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर…

विहिरीत पाय घसरून पडल्याने मजूराचा मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील अट्रावल गावात विहीरीच्या कामासाठी गेलेल्या एका मजुराचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,…

लष्करातील जवानाने ट्रक ड्रायव्हरला घातली गोळी…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क: अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ शूट केल्याबद्दल एका लष्करी अधिकाऱ्याने त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने (service revolver) ट्रक ड्रायव्हरवर गोळी झाडली. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) हा सर्व प्रकार…

धक्कादायक; क्रूर मातेने घेतला तीन वर्षाच्या मुलीचा जीव…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: आई आणि बाळाचे नातं कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. आईची माया काय असते आणि ती तिच्या लेकरांसाठी कुठल्या हद्दीपर्यंत पोहोचेल याची सीमा नसते. मात्र एका आई ने आपल्या व तिच्या प्रियकराच्या आड…

गोराडखेडा येथील प्राथमिक शाळेतून दोन एलईडी टीव्ही संच लांबविले

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील जळगाव ते पाचोरा राज्य महामार्गालगत असलेल्या गोराडखेडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अज्ञात चोरट्यांनी दगडाने तीन शाळा खोल्यांचे दरवाजे तोडून तीन एल. ई. डी. टी. व्ही. संचची चोरी…

मोरगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा ; १६ जुगाऱ्यांना अटक

५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; एलसीबीची कारवाई जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ६ मार्च रोजी रावेर तालुक्यातील मोरगाव येथे बेकायदेशीर सुरू असलेलया जुगार अड्ड्यावर पहाटे ४ वाजता छापा टाकून सुमारे ५५…

सतना येथे बँकेसमोर वृद्धाची गोळ्या झाडून हत्या, २२ लाखांची लुट

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सतना शहरातील मुखतियार गंजचे आहे. जिथे दरोडेखोरांनी दारू कंपनीच्या वृद्ध कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्याच्याकडील सुमारे 22 लाख रुपये लुटून पलायन केले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच…

मनीष सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची होळी तिहार तुरुंगात साजरी केली जाणार आहे. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने 20 मार्चपर्यंत पाठवली आहे. सोमवारी सीबीआय कोठडी…

मांडळ येथील तरुणाच्या खूनप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तरूणाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून खून करण्याच्या प्रयत्नातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील मांडळ येथील जयवंत कोळी या तरूणाचा १७ जानेवारी रोजी त्यांच्या शिवारातील शेतात निर्घृण खून झाला…

गीतांजली एक्स्प्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल चोरला

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क जनरल कोचमध्ये चढताना प्रवाशाचा 19 हजार 400 रुपये किंमतीचा अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लांबवल्याचा प्रकार गीतांजली एक्स्प्रेसमध्ये घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटन गुलाब पिंजारी (46,…

प्रेरणा एक्स्प्रेसमधून चोरट्याने महिलेची पर्स लांबविली

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क प्रवासी झोपल्याची संधी साधून प्रेरणा एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या महिला प्रवाशाची पर्स चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.…

पुष्पक एक्सप्रेसमध्ये दोन महिलांचा विनयभंग ; गुन्हा दाखल

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क उभ्या असलेल्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये दोन महिलांचा विनयभंग केल्याची घटना भुसावळ रेल्वे स्थानकावर घडली असून जळगाव येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगावातील रहिवासी…

अरे बापरे .. ! ; २५ लाख रूपयांची केळीची खोडे माथेफिरूंनी कापली !

यावल लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल परिसरातील एका शेतकर्‍याच्या शेतातील तब्बल २५ लाख रूपये किंमत असलेली केळीची खोडे माथेफिरूने कापून फेकल्याचे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यात मध्यंतरी अनेक शिवारांमध्ये केळी…

सप्तशृंगीगड दानपेटी प्रकरणी सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची दिशा बदलून त्यावर चुना लावत सुरक्षा रक्षकानेच सप्तशृंगीगड येथे भगवती मंदिर परिसरातील दानपेटीतून रोकड काढल्याने त्याच्या विरोधात कळवण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.…

प्रवासात ओळख; बलात्काराचा व्हिडीओ… तरुणीकडून लाटले १६ लाख रुपये…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: बस प्रवासात ओळख झाल्यानंतर पुण्यात पुस्तके खरेदीसाठी आलेल्या तरुणीला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर…

कोरोनावरील स्पुटनिक लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाचा खून…

अंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर स्पुटनिक व्ही ही रशियन लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांच्या चमुतील एका वैज्ञानिकाची बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. आंद्रे बोटीकोव्ह असं…

जिल्ह्यातील दोघांवर २ वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जळगाव शहरातील एका टोळीच्या प्रमुखासह टोळीच्या एका सदस्याला जिल्हयातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. याबाबचे आदेश शुक्रवार, ३ मार्च रोजी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिले…

विरवाडे येथे किरकोळ कारणावरून तरुणाचा खून

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील विरवाडे येथे 2 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणाच्या घरी जावून दमदाटी व धक्काबुक्की करून चाकूचे वार करून तरुणाचा खून झाला आहे. या प्रकरणी…

एसटी आणि टेम्पोत जोरदार धडक, एक ठार ३० जखमी…

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोत जोरदार धडक झाली आहे.…

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई ; 25 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात गुटखा विक्री व वाहतुकीविरुध्द अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाने मोहिम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांचे पथकाने गुरुवार २ मार्च, २०२३ रोजी…

जळगावात महिलेचा विनयभंग ; दोघांवर गुन्हा

जळगाव , लोकशाही नेटवर्क दोन जणांनी ३५ वर्षीय महिलेला अश्लिल शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी २ मार्च रोजी दुपारी जळगाव शहरातील महिला दक्षता समिती कार्यालयाच्या बाहेर घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दोन…

धापा बांधण्याच्या कारणावरून दोघांना मारहाण

पहूर , लोकशाही नेटवर्क गटारीवर धापा बांधण्याच्या कारणावरून तरुणासह घरातील इतर दोघांना लोखंडी आसारीने मारहाण करून गंभीर दुखापत जामनेर तालुक्यातील गोद्री येथे घडली. या घटनेबाबत गुरूवार २ मार्च रोजी रात्री १० वाजता पहूर पोलीस स्टेशनला ६…

डंपरमधून ४०० लीटर डिझेल चोरणाऱ्या दोघांना पकडले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरमधून ४०० लीटर डिझेल ३८ हजार रूपये किमतीचे चोरी करतांना दोन जणांना एल.एच.शाळेजवळ रंगेहात पकडले असून दोघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २ मार्च…

जळगावात ट्रॅक्टरची बैलगाडीला जोरदार धडक ; बैलजोडी ठार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क  भरधाव वेगाने येणार्‍या ट्रॅक्टरने दिल्याने रस्त्यावर उभ्या केलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने २ बैलांचा जागी मृत्यू झाल्याची घटना जळगाव ते कानळदा रोडवर आज सकाळी १० वाजता घडली आहे. सूत्रांनी…

पंजाब मेलमधून झोपलेल्या प्रवाशाचा ऐवज लांबविला

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क चोरट्यांनी प्रवासी झोपल्याची संधी हेरून पंजाब मेलमधून प्रवास एक लाख 37 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी भोपाळ लोहमार्ग पोलिसांकडून शून्य क्रमांकाने बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

भुसावळात एकाने घेतला गळफास

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात एका ४९ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोलाणी कॉम्लेक्स भागातील रहिवासी असलेल्या सुरेश दामोदर महाजन (49) असे…

पेपर देऊन घरी परततांना दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत…

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंढरपूर तालुक्यातल्या करकंब जवळच्या बार्डी रोडवर दहावीचा पेपर देऊन घरी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत भयानक अपघात घडला आहे. या अपघातामुळे पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राधा नागनाथ आवटे ही…

धक्कादायक; माथेफिरू प्रियकराने प्रेयसीला चाकूनं १७ वेळा भोसकलं…

बंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क: बंगळुरूत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. प्रियकरानं आपल्या प्रेयसीची भररस्त्यात चाकूनं भोसकून हत्या केली. प्रियकराच्या चाकू हल्ल्यात जीव गमावलेल्या लिला पविथ्रानं आरोपी दिनकरची तक्रार…

बोदवडमधून शेतकऱ्याची सव्वा दोन लाखांची रोकड लंपास

बोदवड , लोकशाही न्यूज नेटवर्क दुचाकीने जाणाऱ्या वृद्धाला आवाज देऊन बाबा तुमचे खाली पैसे पडले आहेत असे सांगत तीन भामट्यानी २ लाख १६ हजारांची रोकड असलेली पिशवी लंपास करून पोबारा केल्याचा प्रकार बोदवड शहरात घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल…

जळगावात विद्यार्थ्याचा मोबाईल लांबविणारा अटकेत !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क दुचाकीवरून आलेल्या भामट्यानी रस्त्याने पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोबाईल घेऊन पोबारा केल्याचा प्रकार २८ रोजी घडला असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एका संशयिताला…

हृदयद्रावक; दहावीचा पेपर द्यायला निघाले… मात्र, वाटेत काळानं हेरलं…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: सिन्नर घोटी हायवेवर आगासखिंड शिवारात सकाळी दहा वाजेच्या सुमारास एचपी गॅस टँकर आणि अॅक्टिवा यांच्यात भीषण अपघात होऊन दोन शाळकरी मुलांचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिन्नर शहराजवळील…

जळगावच्या मेहरूण तलावात बुडून ६० वर्षीय इसमाचा मृत्यू

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील मेहरूण तलावात आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बबन नामदेव पवार (वय-६३) रा. जूनी वसाहत, जगवानी नगर, जळगाव असे मृत इसमाचे नाव आहे.याबाबत एमआयडीसी पोलिसांत…

बनावट चलनी नोटा छापणाऱ्या भामट्याला अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बनावट चलनी नोटा यूट्यूब’वरील व्हिडिओ पाहून छापणाऱ्या तरुणाला जळगाव पोलिसांनी एमआयडीसीतील व्ही सेक्टर मधून छापा टाकून अटक केली आहे. देविदास पुंडलिक आढाव (वय-३०,रा. कुसुंबा ता. जि. जळगाव), असे संशयित आरोपीचे…

विनापरवाना लाकडांची वाहतूक करणारे वाहन पकडले; एकावर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यात वृक्षांची तोड करणारा माफीया मोठया प्रमाणावर सक्रीय झाला असुन, वृक्षाची कत्तल करून परप्रातांत पाठविण्यात येत आहे. २८ फेबूवारी रोजी वन विभागाच्या…

पारोळा बस स्थानकात वृद्धाला अधिकारी असल्याचे सांगत लुटले…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा येथे एका वृद्धाला दोन चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरट्यांनी वृद्धाकडील तीस हजार रुपये लंपास केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी…

धक्कादायक; उसाच्या मळ्याच्या आगीत सापडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: किन्ही येथे उसाच्या मळ्यातील पाला पाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीत स्वतः होरपळून हनुमंतखेडा येथील ८२ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये…

जळगावात अपघातामध्ये आमोद्याचा तरुण ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्क जवळ मंगळवारी रात्री 11.30 वाजता भरधाव दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात आमोद्यातील दुचाकीस्वार ठार झाला तर तिघे जखमी झाले. अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात…

जळगावातील एकावर एमपीडीएची कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील समीर हनीफ काकर या तरुणास एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. समीर काकर याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न या कलमाखाली एक, गंभीर दुखापत करणे या कलमाखाली एक, गर्दीसह दुखापत…

अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांच्या जामीन अर्जावर उद्या कामकाज

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मविप्र संस्थेतील दाखल गुन्ह्यातील संशयित तथा जळगावील रहिवासी निलेश भोईटे यांच्या घराची झडती घेण्यापूर्वी घरात रक्ताने भरलेला सुरा पुणे पोलिसांना मिळून येईल, असा कट रचल्याच्या गुन्ह्यात अ‍ॅड.प्रवीण…

जळगावात सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील उस्मानियॉ पार्क येथील बुधवारी सकाळी उघडकीस आली असून याबाबत शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची…

संजय राऊत यांच्या हक्क भंग प्रस्तावावर ८ मार्चला निर्णय

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क संजय राऊत यांच्या विधानावरुन प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने सभागृह तहकूब करण्यात आले. संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्क भंग प्रस्तावावर ८ मार्चला निर्णय होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून…

पंजाब मेल चोरीप्रकरणाचा उलगडा ; जळगावचा चोरटा मुद्देमालांसह जाळ्यात

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क पंजाब मेलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणात जळगावातील आरोपीला भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तीन लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे जयेश अशोक राजपूत (19, मयूर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव)…

ललित कोल्हे यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष व माजी महापौर ललित कोल्हे व त्यांच्यासह पाच ते सहा जणांनी रेमंड कंपनी परिसरात औद्योगिक न्यायालयाचे आदेश असतानाही गर्दी जमवून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी…

पाचोऱ्यात १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागात राहणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्याने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस…

पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क एका तरूणाला अज्ञात चार दरोडेखोरांनी पिस्तूलाचा धाक दाखवून दुचाकीसह हातातील मोबाईल जबरी हिसकावून लंपास केल्याची घटना यावल-भुसावळ रस्त्यावर घडली होती. याप्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करण रमेश…

विचखेडे येथे युरियाचे पाणी पिल्याने पाच म्हशीं दगावल्या !

पारोळा ,लोकशाही न्यूज नेटवर्क पिकांसाठी सोडण्यात आलेल्या युरियामिश्रित पाणी पिल्याने ५ म्हशी दगावल्या असून इतर गुरांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मात्र ५ म्हशी दगावल्याने ५ लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती…

अंजाळे घाटाजवळ पिस्तुलचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुटले

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील अंजाळे घाटाजवळ एका दुचाकीस्वाराला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्या मोटारसायकलीसह लुटल्याची धक्कादायक घटना आज रात्री घडली. सविस्तर वृत्त असे की यावल-भुसावळ कडून येत असताना अजय रमाकांत मोरे हे…

बस कंडक्टर महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बसमध्ये एका महिला बस कंडक्टरचा अश्लील हातवारे करून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात ला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव-जामनेर मार्गावर जाणा-या बसमध्ये २७…

संशयित दहशतवादी सरफराज मेमनला पोलिसांनी केली अटक

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क संशयित दहशतवादी सरफराज मेमनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती एनआयए ने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना याबाबत माहिती पुरवली होती. एनआयएने माहितीच्या आधारे इंदूर…

पाच मोबाइलसह चोरट्याला पकडले ; चाळीसगाव पोलिसांची कारवाई

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील दर्गा परिसरात चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला शहर पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेत चाळीस हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त केल्याची कारवाई केली. कुणाल कुंदन पवार रा. वाघळी ता.…

मुंबईत धोकादायक व्यक्तीचा वावर ; एनआयएकडून अलर्ट जारी

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील एक मेल एनआयए या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये पोलिसांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीन, हाँगकाँग आणि…

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार ; ५ जण ताब्यात

गुमला , लोकशाही न्यूज नेटवर्क गुमला जिल्ह्यातील घाघरा पोलीस स्टेशन हद्दीतील देवकी गावात 5 जणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच आरोपी तरुणांना अटक केली. अटक…

गिरणानदी पात्रातील होणारी अवैध वाळू वाहतूक बंद करून कारवाई करा

वडजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचे तहसीलदारांना निवेदन भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील वाक-वडजी येथील गिरणा नदी पात्रातील वडजी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर सप्लाय विहिरी जवळून सर्रास जे.सि.बी. द्वारे नदीतून वाळूचे…

जळगावात तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण ; गुन्हा दाखल

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील मेहरूण परिसरातील पोल्ट्री फार्मजवळ घडली असून याप्रकरणी रविवारी २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा…

जबरी लूट आणि विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जबरी चोरी व विनयभंग प्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने रविवार 26 फेब्रुवारी अटक केली आहे. केवल अनिल टाक (वय-२७ रा. वाल्मिक नगर, जळगाव) असे…