अनोळखी महिला पुरुषाने केले लहान मुलाचे अपहरण ; घटना सीसीटीव्हीत कैद

0

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क

आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा मंदिरातून अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना समोर आली असून हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आयुष नावाच्या मुलाचा पोलिस कसून तपास करीत आहेत.

याबाबतची फिर्याद सुषमा राहुल नाईकनवरे यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे. सातारा जिल्ह्यातील शिवाजीनगर (ता. खंडाळा) येथील सुषमा राहुल नाईकनवरे या शनिवारी (दि. ४) रोजी सकाळी आपला लहान मुलगा आयुष (वय ६) याला सोबत घेऊन बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या.

त्यावेळी मंदिराशेजारील हॉलमधून एक अनोळखी व्यक्ती अंदाजे ५० वर्षांचा पुरुष तसेच अनोळखी महिला अंदाजे ३० वर्षे वयाची यांनी फूस लावून आयुष याला पळवून नेले. आयुषला मोटारसायकलवरून नेत असताना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाले आहे. अधिक तपास भुदरगड पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.