खा.रक्षा खडसे यांनी घेतली आ.चंद्रकांत पाटील यांची भेट

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क-

आज महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर चे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मन धरणीसाठी काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर येथे आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आमदार पाटील यांची भेट घेतली होती. यानंतर भुसावळ येथे महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचार सभेसाठी आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भुसावळ येथे आमदार पाटील यांच्यासोबत भेट झालेली होती. तसेच नऊ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेशाने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनीही आमदार चंद्रकांत पाटील व मुक्ताईनगर येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली. आणि महायुतीच्या उमेदवार यांचा प्रचार करण्यासाठी सूचना केल्या त्या पद्धतीने काम देखील शिवसेनेचे सुरू आहे. पण महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी अद्यापही आमदार पाटील यांची भेट नघेतल्याने शिवसैनिकांची खदखद होती. कालच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आज खासदार रक्षा खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन प्रचार नियोजन संदर्भात चर्चा केली. यावेळी भाजपचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटु भोई, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, जिल्हा संघटक सुनिल पाटिल, तालुका प्रमुख नवनीत पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, शहर प्रमुख गणेश टोंगे व शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.