धक्कादायक; उसाच्या मळ्याच्या आगीत सापडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

किन्ही येथे उसाच्या मळ्यातील पाला पाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीत स्वतः होरपळून हनुमंतखेडा येथील ८२ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हनुमंतखेडा ता. सोयगाव येथील रहिवाशी गोकुळ रामदास पवार (८२) हे आज १ मार्च रोजी किन्ही शिवारातील शेतात दुपारच्या सुमारास हात मजुरी करण्यासाठी गेले होते. दरम्यान उसाच्या मळ्यात पाला पाचोळा जास्त झाल्याने गोकुळ पवार यांनी तो गोळा करुन जाळला मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले, ती आग विझविण्याच्या प्रयत्नात गोकुळ पवार यांचा आगीच्या विळख्यात सापडून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच तात्काळ गोकुळ पवार यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी गोकुळ पवार यांना मृत घोषित केले.

घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली आहे. मयत गोकुळ पवार यांचे पाश्चात्य वृद्ध पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असुन गोकुळ पवार यांच्या दुर्दैवी निधनाने हनुमंतखेडा व किन्ही परिसरात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here