विहिरीत पाय घसरून पडल्याने मजूराचा मृत्यू…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील अट्रावल गावात विहीरीच्या कामासाठी गेलेल्या एका मजुराचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील अट्रावल येथील रहिवासी भिमराव अंकात कोळी (५०) हे रविवारी ५ मार्च रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास गावातील मुंजोबा गेट जवळ असलेल्या गावाच्या ग्रामपंचायत विहीरीवर गोद कामासाठी गेले होते. त्यावेळी विहीरीत खाली उतरतांना त्यांचा पाय घसरल्याने ते विहीरीत खाली पडले. यादरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत मयताचा पुतण्या लखन दिनकर कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here