बस कंडक्टर महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

बसमध्ये एका महिला बस कंडक्टरचा अश्लील हातवारे करून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात ला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव-जामनेर मार्गावर जाणा-या बसमध्ये २७ फेब्रुवारी २०२३ रोजी महिला कंडक्टर तिकीट बुकींगचे काम करत होअसतांना जामनेर तालुक्याच्या माळपिंप्री येथील अभय गाढेकर या प्रवाशाला महिला वाहकाने ‘भाऊ तू तिकीट काढून घे’, असे म्हटले. त्यावर अभय गाढेकर याने महिला वाहकाकडे वाईट नजरेने बघत अश्लील हातवारे केल्याचा आरोप महिला कंडक्टरने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. महिला वाहकाने दिलेल्याअ तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. विजय पाटील हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.