डंपरमधून ४०० लीटर डिझेल चोरणाऱ्या दोघांना पकडले

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरमधून ४०० लीटर डिझेल ३८ हजार रूपये किमतीचे चोरी करतांना दोन जणांना एल.एच.शाळेजवळ रंगेहात पकडले असून दोघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता दोघांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील आदर्श नगरात राहणारे मयुर रविंद्र चौधरी (वय-२९) यांचे मालकीचे डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ४७२३ आणि एमएच १९ झेड ८०२४) हे दोन डंपर शहरातील एल.एच.शाळेच्या जवळ पार्किंगला लावलेले असताना गुरूवार २ मार्च रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास प्रविण हंसराज राठोड आणि ज्ञानेश्वर उखा राठोड दोन्ही रा. रामदेववाडी ता.जि.जळगाव हे दोघेजण डंपरमधून डिझेलची चोरी करतांना रंगेहात सापडले. . . त्यांची अधिक चौकशी केली असता दोघांनी गेल्या दोन महिन्यांपासून वेळोवेळी उभ्या असलेल्या डंपरमधून सुमारे ३८ हजार रूपये किंमतीचे ४०० लिटर डिझेल चोरून नेल्यानेल्याचे कबूल केले . दोघांना पकडून एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. याप्रकरणी गुरूवार २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मयुर रविंद्र चौधरी रा. आदर्श नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ नितीन पाटील पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.