नवाझुद्दीनने भर रात्री काढल पत्नी, मुलांना घराबाहेर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि पत्नी आलीया सिद्दीकी यांच्यातले वादिवसेंदिवस विकोपाला जात असून थांबायचे नाव घेत नाही आहे. पुन्हा आलियाने एक व्हिडीओच्या माध्यमातून तिच्यासोबत काय घडले ते सांगतांना दिसत आहे. कधी आलिया नवाज वर गंभीर आरोप करते तर कधी त्याचे व्हिडिओ शेअर करत असते. हे प्रकरण आता कोर्टात सुरु आहे. दरम्यान आज पुन्हा आलियाने रडतांनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातुन तिनं नावजने मध्यरात्री तिला आणि तिच्या दोन्ही मुलांना घराबाहेर काढल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाली आलीया

आलियाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या व्हिडिओमध्ये आलिया दोन्ही मुलांसोबत बंगल्याबाहेर दिसत आहे. या व्हिडिओत दोन्ही मुलेही रडताना दिसत आहेत.व्हिडिओत नवाजबद्दल आलिया म्हणाली की, अभिनेता इतका खालच्या पातळीवर जाईल हे तिला कधीच वाटलं नव्हते. त्यांना बंगल्याच्या बाहेर फेकण्यात आलं आहे. आता ती कुठे जाईन हे तिला माहीत नसल्याचं ती म्हणते.

Leave A Reply

Your email address will not be published.