नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्यातरी राज्याच्या राजकारणातून मोती बातमी समोर येत आहे. सर्वात प्रचलित नाव आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या विरोधात सत्र न्यायालयाने निर्णय दिला आहे. आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे. २०१७ साली दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महापालिकेत केलं होते आंदोलन. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शिवीगाळ केली होती. यानंतर आता बच्चू कडू याना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.