पाच मोबाइलसह चोरट्याला पकडले ; चाळीसगाव पोलिसांची कारवाई

0

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील दर्गा परिसरात चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला शहर पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेत चाळीस हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त केल्याची कारवाई केली. कुणाल कुंदन पवार रा. वाघळी ता. चाळीसगाव असे या चोरट्याचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, चाळीसगाव शहरातील दर्गा परिसरात चोरीचा मोबाईल विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यावर शहर पोलीसांनी सापळा रचून कुणाल कुंदन पवार त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आढळून आले.याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-१२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

हि कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुहास आव्हाड, पोना महेंद्र पाटील, राहुल सोनवणे, निलेश पाटील, नरेंद्र चौधरी, विनोद खैरनार, निलेश पाटील, भूषण पाटील, ज्ञानेश्वर गीते आदींनी केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार महेंद्र पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.