फिल्मी स्टाईलने चालत्या मालगाडीवर चढून कोळसा चोरीच्या प्रकरणात वाढ

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिपनगर औष्णीक विद्युत प्रकल्पात दररोज शेकडो टन कोळशाची मागणी असल्याने गेली कित्तेक वर्षापासुन दररोज वरणगाव, फुलगाव मार्गे रेल्वेने कोळसा आणला जात आहे. मात्र फुलगावमधील काही चोरट्यांनी रेल्वेने येणारा कोळसा चोरण्यासाठी ३०ते ४० लोकांची टोळी तयार केल्याची चर्चा आहे. या टोळीतील सर्व सराईत गुन्हेगार असुन यांच्‍यावर रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा विभागात विविध गुन्ह्यांच्या (Crime News) नोंदी आहेत.

विद्युत निर्मिती करीता लागणारा कोळसा वरणगाव व फुलगावमार्गे दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातमध्ये (Railway) रेल्वेने वाहतूक करून आणला जातो. मात्र प्रकल्पबाह्य भागात हाकेच्या अंतरापर्यंत फिल्मी स्टाईलने चालत्या मालगाडीवर चढून कोळसा चोरीच्या प्रकरणात वाढ होत आहे. दररोज लाखों रूपयांचा कोळसा चोरी होत आहे. दिपनगर प्रशासनाने सुरक्षेत वाढ केल्यावर सुद्धा चोऱ्या थांबत नाही. वरणगाव (Varangaon) पोलिसांत तीन संशयीतांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोळीतील मंडळी गुन्हेगारी क्षेत्रात प्रख्यात असल्याने ते कोणाला मारायला व स्वतः मरायला सुध्दा घाबरत नाही. म्हणून दिपनगर प्रशासनाची कडक सुरक्षा असतांना देखील बिनधास्तपणे रेल्वेच्या मालगाडीवर चढून कोळशाची दिवसाढवळ्या चोरी करत असतात. त्यांना ना आरपीएफची भीती आहे, ना पोलिस व दिपनगरच्या सुरक्षा विभागाची भिती. त्यांची चोरीची शैली देखील कोणालाही पाहून आश्चर्य वाटेल. प्रकल्पाच्या २०० पावलांच्या अंतरावर या टोळ्यांमधील चोरटे चालत्या ट्रेनमधून कोळसा चोरण्यात पटाईत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.