जळगावात ट्रॅक्टरची बैलगाडीला जोरदार धडक ; बैलजोडी ठार

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क 

भरधाव वेगाने येणार्‍या ट्रॅक्टरने दिल्याने रस्त्यावर उभ्या केलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने २ बैलांचा जागी मृत्यू झाल्याची घटना जळगाव ते कानळदा रोडवर आज सकाळी १० वाजता घडली आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव कानळदा रोडच्या बाजूला असलेल्या दगडू राजाराम धनगर रा. आव्हाणे ता. जि.जळगाव यांचे लक्ष्मी जिनिंग जवळ शेत आहे. शुक्रवार ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता दगडू धनगर हे मुलगा रावसाहेब धनगर यांच्यासोबत शेतातील पिकांना खत देण्यासाठी बैलगाडीने रासायनिक खते घेऊन शेतात गेले. त्यावेळी त्यांनी शेताच्या बाजूला असलेल्या रोडवर बैलगाडी उभी करून रासायनिक खते शेतात डोक्यावरून नेत होते. दरम्यान रस्त्यावर उभी असलेली बैलगाडीला जळगावकडून गिरणा नदीत जाणार्‍या भरधाव वाळूच्या रिकाम्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.

या धडकेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला तर बैलगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रॅक्टर देखील पलटी होऊन बाजूला पडले. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत व मदतकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.