पंजाब मेलमधून झोपलेल्या प्रवाशाचा ऐवज लांबविला

0

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क

चोरट्यांनी प्रवासी झोपल्याची संधी हेरून पंजाब मेलमधून प्रवास एक लाख 37 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी भोपाळ लोहमार्ग पोलिसांकडून शून्य क्रमांकाने बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम मिश्रा (भोपाळ) हे 26 फेब्रुवारीला पंजाब मेलच्या ए-1 या डब्यातील 49 क्रमांकाच्या सीटवरून प्रवास करीत असतांना ते झोपलेले असताना चोरट्यांने संधी साधून मनमाड ते जळगाव या दरम्यान रात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांची बॅग लांबविली. त्यात मोबाईल, सोन्याच्या रींगसह अन्य साहित्य होते. चोरट्याने एक लाख 37 हजार 400 रुपयांचा ऐवज लांबविला आहे. पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र ठाकूर तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.