अमळनेरात घरफोडी ; दीड लाखांचा ऐवज लांबविला

0

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
बंद घर फोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने व महत्वाची कागदपत्रे असा एकुण १ लाख ५२ हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना अमळनेर शहरातील भगवा चौकयेथे उघड झाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दिपक जगन्नाथ सुर्यवंशी (वय-४०) रा. पाटील कॉलनी, भगवा चौक, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सलुन दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. ७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता हे घर बंद करून बाहेर गेलेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कूलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असा एकुण १ लाख ५२ हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दुपारी ३ वाजता ते घरी आले तेव्हा घराचे कुलूप तेाडलेले दिसून आले. दिपक सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.