महिला तज्ञांनीच जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा — डॉ.केतकी पाटील

0

आरोग्य विज्ञान विद्यापीठ रौप्य महोत्सवानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

महिलांच्या आरोग्याबाबत महिला तज्ञांनीच पुढाकार घेणे गरजेचे असून महिलांनी देखिल आजार लपवण्यापेक्षा खुलून बोलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गोदावरी फॉउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकीताई पाटील यांनी आज केले. आज जळगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ रौप्य महोत्सवानिमित्त महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलतांना स्तनांची गाठ असो वा गर्भाशयाचे आजार महिलांनी संकोच न बाळगता वेळीच तज्ञ डॉक्टरांना खुलून सांगितले तर उपाय करणे सोपे होवून जिव वाचतो. यानंतर ब—याच वेळी मासिक पाळी, रक्‍त जाणे यासारख्या समस्या लज्जेखातर सांगितल्या जात नाही ही परिस्थीती बदलण्यासाठी भावी महिला तज्ञांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखिल त्यांनी केले. आज अनेक महिला रूग्ण वरील आजारांना लपवून ठेवत सहन करत आहे असे रूग्ण शोधून उपचार व जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. रॅलीचा भाउचे उदयान येथे प्रारंभ होवून आकाशवाणी चौक ते परत भाउचे उदयान येथे समारोप करण्यात आला.या रॅलीमध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय जळगाव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, गोदावरी फाउंडेशन व डॉ.उल्हास पाटील आणि वैद्यकीय महाविद्यालय जळगाव खुर्द., डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय जळगाव, श्री चामुंडा माता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय साकेगाव इत्यादी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुभाष चंद्र मडावी, महाराष्ट्र आयुर्वेदिक विज्ञान विद्यापीठाचे समन्वयक डॉ. राजेश कोल्हारकर,शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश महाजन, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. दिलीप ढेकळे, एकरा महाविद्यालयाचे डॉक्टर अब्दुल कडूस,डॉ. संगीता गावित आणि प्राध्यापक, डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने भाऊचे उद्यान येथे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीराम रगड यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.