जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
गोदावरी फॉउंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात स्वतंत्र महिला शस्त्रक्रिया विभाग सूरू करण्यात आला आहे.
या विभागात महिलांमधील मुळव्याध, बध्दकोष्टता, भगंदर आणि व्हेरीकोज व्हेन्स सह विविध आजारावर उपचार केले जाणार आहे. यासाठी डॉ. स्मृती भोजने, डॉ. मैत्रेयी बिरादर, डॉ. सेजोल कश्यप, डॉ. श्वेता गाढवे या महिला तज्ञांची नियुक्ती केली असून सकाळी ९ ते ५ या वेळेत रूग्णालयात मोफत तपासणी करणार आहे. यानंतर विविध तपासणीसाठी अत्यल्प दर ठेवण्यात आले असून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणा—या सर्व शस्त्रक्रिया महिला तज्ञांव्दारे मोफत केल्या जाणार आहे. महिला सहसा आपल्या आजाराबददल बोलत नाही नंतर आजार वाढत जावून अगदी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून महिला तज्ञांच्या माध्यमातून या विषयावर जनजागृती करण्याचा मानस असल्याचे डॉ. केतकीताई पाटील यांनी सांगितले.
महिलांसाठी हेल्पलाईन सूरू करण्यात आली असून डॉ. स्मृती भोजने ९६०४०३०७६१, डॉ. श्वेता गाढवे ९७६६२४९००० या क्रमांकवर खुलून बोलू शकतील याचबरोबर स्वतंत्र प्रशस्त वार्डही स्थापन करण्यात आला असून या महिला तज्ञांव्दारेच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आज पहिल्याच दिवशी १५ महिलांची तपासणी देखिल करण्यात आली आहे. या विभागाच्या माध्यमातून गावागावात जावून शिबिराच्या माध्यमातून महिलांची तपासणी केली जाणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी तज्ञांशी संपर्क साधून आजाराबददल तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे करण्यात येत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.