घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

0

मुंबई ;- मुंबईला हादरवून सोडणाऱ्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी कंपनीचा मालक भावेश भिंडेचा पोलीस शोध घेत होते. पण तो फरार होता. पण अखेर तो पोलिसांच्या हाती लागला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

भावेशच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घाटकोपरमध्ये छेडानगर परिसरात पेट्रोल पंपच्या बाजूला अनधिकृत भव्य मोठं होर्डिंग उभारलं होतं. हे होर्डिंग 120×120 आकाराचे होते . विशेष म्हणजे मुंबई महापालिकेची कोणतीही परवानगी या होर्डिंगसाठी घेण्यात आली नव्हती. तरीही ते उभारण्यात आलं होतं. या आवाढव्य होर्डिंगचं वजन जास्त असल्याने दोन दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग जमिनीच्या दिशेला झुकलं आणि थेट बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर कोसळलं. त्यामुळे मोठा हाहा:कार उडाला. या दुर्घटनेत जवळपास 120 पेक्षा जास्त नागरीक ढिगाऱ्याखाली दबले होते.

होर्डिंग दुर्धघटनेच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. तर या घटनेला दोषी ठरणाऱ्या आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर भावेश भिंडे याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झाला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.