Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अंजाळे घाटाजवळ पिस्तुलचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुटले
    गुन्हे वार्ता

    अंजाळे घाटाजवळ पिस्तुलचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुटले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 28, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क
    तालुक्यातील अंजाळे घाटाजवळ एका दुचाकीस्वाराला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्या मोटारसायकलीसह लुटल्याची धक्कादायक घटना आज रात्री घडली. सविस्तर वृत्त असे की यावल-भुसावळ कडून येत असताना अजय रमाकांत मोरे हे त्यांच्या शाईन कंपनीच्या मोटरसायकल येत होते त्यांना अंजाळे घाटावर २४ ते २५ वर्षे वयोगटातील चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी मोरे यांची मोटरसायकल रोखत त्यांना पिस्तोलचा धाक दाखवून त्यांचे कडील मोटर सायकल सह मोबाईल घेऊन पसार झाले.

    सदरची घटना रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली असून . हि माहिती यावल पोलीस ठाण्यात कळताच पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान व पोलीस पथक तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंजाळा घाटात आता मोठा पूल झाला असल्याने हा भाग आधीपेक्षा सुरक्षीत झालेला असतांना  याच परिसरात दुचाकीस्वाराला लुटल्याची घटना घडल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

    दरम्यान, चोरटे त्यांचे कडील बुलेट व एक्टिवा गाडीने आले होते . यावेळी आरडाओरड होत असल्याचे पाहुन काही नागरीक धावुन येत असल्याचे पाहुन चोरटे घटनास्थळावरून पसार झाले . अंजाळे घाटावर गेल्या अनेक वर्षापासुन पोलीस चौकी बांधण्यात आली असुन ही पोलीस चौकी निव्वळ शोभेची वस्तु झाली आहे. येथे पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

    #crime jalgaon LUTMAR Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif