इंदोर येथे होणाऱ्या कसोटी सामन्यात ह्या खेळाडूला मिळू शकते संधी

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

लवकरच आता बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील (Border-Gavaskar Trophy) तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदूर (Indore) येथे सुरू होत आहे. खेळाडू चांगल्या कामगिरीसाठी आपल्या घाम तासन तास मैदानात गाळत आहे. या कसोटीत भारतीय संघाची प्लेईंग 11 कशी असेल याबाबत चर्चा सुरू आहे. भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) हा आऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला खेळवण्यासाठी संघ व्यवस्थापनावर दबाव आहे.

दरम्यान, तिसऱ्या कसोटीच्या सराव सत्रावेळी एक विशेष बाब क्रिकेट चाहत्यांच्या नजरेस पडली. भारतीय संघाने (Indian team) दिल्ली कसोटी सामना तीन दिवसांच्या आतच संपवला. त्यानंतर संघाला सहा दिवसांचा ब्रेक मिळाला होता. या सहा दिवसांच्या ब्रेकनंतर रोहित शर्मा आणि त्याची संघ तिसरा कसोटी सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी सज्ज होत आहेत.

दरम्यान, सराव सत्रावेळी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) शुभमन गिलला (Shubman Gill) स्वतः गोलंदाजी करताना दिसला होता. यावरून गिलला तिसऱ्या कसोटीत संधी मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातच भारताचे माती प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी तिसऱ्या कसोटीत शुभमन गिलला सलामीला खेळवण्यात येईल असे भाकीत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.