पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा तालुक्यातील मोढांळे व हिवरखेडे येथे मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या सहवासामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण होते. आज अखेर हा बिबट्या पाण्याचा शोधात फिरत असताना टिटवी येथिल कठडा नसलेल्या विहिरीत पडलेला आढळून आला . सकाळी शेतातील शेतकरी शेतात गेले असता त्यांना विहिरीतून आवाज ऐकू येत असल्याचे जाणवले.
त्यांनी विहिरीत पाहिले असता त्यात त्यांना बिबट्या विहिरीच्या पाण्यात आढळुन आला. त्यांनी लागलीच वनविभागाला याची माहिती दिली . तेव्हा तात्काळ वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन बिबट्याला क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून सुखरूप बाहेर काढले . पिंजऱ्यात कैद करुन त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येईल असे यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी बिबट्या ला पाहाण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती याप्रसंगी वनसंरक्षक एस के शिसव,पि जे सोनवणे,आर बी भदाणे,आय बी मोरे एस बी खैरनार,एस बी कुंभारे ,आर बी भदाणे आदी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.