जिल्ह्यातील दोघांवर २ वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जळगाव शहरातील एका टोळीच्या प्रमुखासह टोळीच्या एका सदस्याला जिल्हयातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. याबाबचे आदेश शुक्रवार, ३ मार्च रोजी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिले आहेत.

टोळीप्रमुख संदीप भास्कर ढोके वय २४ व टोळी सदस्य विशाल वाल्मिक जाधव वय २३ दोन्ही रा. गेंदालाल मील अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोघा गुन्हेगारांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांनी हि माहिती प्रसिध्दीसाठी दिली आहे.

गुन्हेगार संदीप ढोके व विशाल जाधव या दोघांविरोधात जळगाव शहरातील पोलिसात वेगवेगळ्या प्रकारचे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नाही, त्यामुळे शहर पोलीस स्टेशनच्या वतीने या दोन्ही गुन्हेगारांच्या हद्दपारीच्या प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आला होता, त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी या प्रस्तावानुसार गुन्हेगार संदीप ढोके व विशाल जाधव या दोघांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांनी दिली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.