पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक

0

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क
एका तरूणाला अज्ञात चार दरोडेखोरांनी पिस्तूलाचा धाक दाखवून दुचाकीसह हातातील मोबाईल जबरी हिसकावून लंपास केल्याची घटना यावल-भुसावळ रस्त्यावर घडली होती. याप्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करण रमेश पवार आणि विक्की अंकुश साळवे दोन्ही रा. आसोदा ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या दोन्ही दरोडेखोरांची नावे आहे. तर त्यांचे दोन साथीदार फरार झाले असून त्यांचाही शोध सुरू आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अजय मोरे हा तरूण भुसावळकडून यावलकडे दुचाकीने रात्री १० वाजेच्या सुमारास येत होता. अंजाळे घाटातून दुचाकीने जात असतांना अज्ञात चार दरोडेखोरांनी अजयचा रस्ता आडविला. पिस्तूलाचा धाक दाखवून त्याच्याजवळील मोबाईल आणि त्याची दुचाकी घेवून पसार झाले होते.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान व त्यांचे पोलीस पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. . पोलीसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून रस्ता लुट प्रकरणातील दोन दरोडेखोरांना यावल शिवारातून अटक करण्यात यश मिळविले. .

 

Leave A Reply

Your email address will not be published.