सहकार भारती तर्फे जिल्हास्तरीय पतपेढयांसाठी कार्यशाळा

0

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क
सहकार भारती जळगाव आणि जिल्हा महानगर यांच्या वतीने 27 फेब्रुवारीस पतसंस्थांचे संचालक,अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंधक विजयसिंग गवळी उपस्थित होते. तर व्यासपीठावर दिलीपदादा पाटील, नरेंद्रजी नारखेडे [फैजपुर] रेवती शेंदुर्णीकर, महानगर अध्यक्ष अनिता वाणी, जिल्हाध्यक्ष विवेक पाटील आणि शरदजी जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता कोत्तावार यांनी केले तर प्रास्ताविक विवेक पाटील यांनी केले. यावेळी नॅपकीन, गुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तर नरेंद्र नारखेडे यांची बहिणाबाई चौधरी विद्यापीठावर सिनेट म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेत पहिल्या सत्रात उत्तमराव थोरात [शेंदुर्णी ], शरदजी जाधव आणि सहा. निबंधक विजयसिंग गवळी यांनी तर दुपारच्या सत्रात प्रकाशजी क्षिरसागर [नासिक] आणि जयदिपजी शहा [जळगाव] यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हयातील पतपेढया सुदृढ व्हाव्यात यासाठी कर्जवसुली संचालक कर्मचाऱ्यांची जबाबदारी, काटकसर तसेच सभासद, ठेविदार, कर्जदार यांच्याशी आपुलकीची वागणुक सामाजिक भान अशा सर्वच बाबींवर मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. तर 97 व्या घटना दुरुस्ती नंतर संचालक, कर्मचारी व सभासद यांना प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे आणि सहकारी भारतीने प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सहकार भारतीचे ऋण निर्देशन केले.
कार्यशाळेस जिल्हयातुन सुमारे 60 प्रतिनिधी सहभागी झाले होते. शेवटी सहकार भारतीच्या संचालक शांता वाणी यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिता वाणी, सुनिता कोत्तावार, रेवती कुरंभट्टी, रेवती शेंदुर्णीकर, सुमेधा करमरकर, उद्यमीच्या पतपेढीच्या दिपाली चौधरी व चारू वाणी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमात सगळयांना उद्यमी पतपेढी तर्फे कापडी पिशव्या वाटण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.