कल्पना सत्यात साकारण्यासाठी स्वप्नासोबत संघटनात्मक कार्याची जोड हवी- डॉ. के. बी. पाटील

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित आणि धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव विद्यार्थी विकास विभाग आयोजित पुढील २५ वर्षातील आपल्या कल्पनेतील विद्यापीठ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, उद्घाटक माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्रा. डॉ. राकेश चौधरी, डॉ‌.जुगल घुगे, डॉ‌.कल्पना भारंबे, डॉ.सुनिता चौधरी हे मंचावर उपस्थित होते. स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात झाले. प्रास्ताविकात डॉ.जुगल घुगे यांनी स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवी वर्षात पुढील २५ वर्षातील आपल्या कल्पनेतील विद्यापीठ या एकदिवसीय कार्यशाळेचा लेखाजोखा मांडताना विद्यापीठाची भुमिका ही फक्त परिक्षा घेऊन पदवीप्रदान करणे इतकाच सिमीत नसुन त्यापेक्षा जास्त आहे.

या प्रसंगी आपल्या उद्घाटकीय मनोगतात माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी पुढील २५ वर्षातील स्वप्नातील विद्यापीठ निर्माण करण्यासाठी सर्वांनी स्वप्न पहावे असे सांगताना, येणाऱ्या काळात रोजगारक्षम आणि गुणवत्ता पुर्ण शिक्षण पध्दती अंगीकारावी लागेल. नवीन शैक्षणिक धोरणात प्रत्येक महाविद्यालय स्वायत्त शैक्षणिक संस्था होण आवश्यकच आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पी. आर चौधरी यांनी १९९४ साली या संस्थेची स्थापना झाली आणि महाविद्यालयाचा प्रवास सुरू झाला. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी कुलगुरू के. बी. पाटील हे प्राचार्य पदी असल्याने महाविद्यालय प्रशासनाचे प्रश्न सोडविण्याचा सरांना अनुभव असल्याने आपल्या संस्थेच्या विकासासाठी त्यांची वेळोवेळी मदत मिळाली. स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी नेहमी सांगत असत, शासन स्तरावर विविध विभागांसाठीचे आर्थिक तरतूद करतांना संरक्षण खात्याला जेवढं आर्थिक बजेट असेल त्याहुनही अधिक जास्त बजेट हे शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी करावे कारण शिक्षणपद्धतीमुळे उत्तम सामाज घडतो. रचनात्मक संस्कृती निर्माण होईल व अंतर्गत सामाजिक प्रश्न लगेच सुटतील. त्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो उच्च शिक्षणात विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना देखील इंटर्नशिप करावी लागणार आहे. असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता चौधरी यांनी तर, आभार डॉ. कल्पना भारंबे यांनी केले. सत्राचे अध्यक्ष म्हणून महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ‌. कल्पना भारंबे, डॉ. यशवंत महाजन तर सत्रसंचालन डॉ. नितीन बडगुजर यांनी केले. समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राकेश चौधरी यांनी कार्यशाळेचा उद्देश सफल झाला असे प्रतिपादन केले.सूत्रसंचालन डॉ. सुनिता चौधरी यांनी केले तर आभार डॉ. कल्पना भारंबे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.