गोदावरी फाऊंडेशनच्या संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्राचा उद्या शुभारंभ

0

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क

दारुच्या नशेमुळे अनेकांचे संसार उद‍्धवस्त होतात तसेच दारु पिणार्‍या व्यक्‍तीचे देखील शारिरीक, मानसिक, सामाजिक हानी मोठ्या प्रमाणावर होते. त्याकरीता दारुसह अन्य व्यसन सोडविण्यासाठी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने पुढाकार घेतला असून बुधवार, दि.१ मार्च रोजी संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्राचा शुभारंभ माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते फित कापून करण्यात येणार आहे.

केंद्र शासन मान्य संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्राचा उद्या शुभारंभ होणार आहे. या केंद्राद्वारे दारुचे व्यसन असणार्‍या आणि मनापासून दारु सोडविण्याची इच्छा असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. दारुच्या अतिसेवनामुळे लिवर खराब होते, पोटाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे दारुची सवय सोडविण्यासाठी आता गोदावरी फाऊंडेशनचे संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्र रुग्णांच्या सेवेत सुरु होत आहे.

दारु सोडविण्यासाठी रुग्णालयात मानसोपचार तज्ञ डॉ.विलास चव्हाण यांच्यासह ८ मानसोपचार डॉक्टरांची टिम कार्यरत असून प्रशस्थ वॉर्डमध्ये रुग्णांना दाखल करुन घेतल्या जाते. सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ५ या वेळेत ओपीडी सुरु असून रुग्ण येथे येवून डॉक्टरांची भेट घेऊ शकतात. डॉक्टरांचा सल्‍ला येथे मोफत दिला जातो. तसेच दारु सोडविण्यासाठी ५ हजार रुपये या अल्पदरात अ‍ॅडमिटची व्यवस्था, भोजन व्यवस्था, औषधी दिली जाते. ‘नशामुक्‍त भारत अभियांनातर्गत’ सहभागी व्हा, अधिक माहितीसाठी डॉ.आदित्य ९४०४४ ७६१११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.