सिरॅमिक हेड वापरुन खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

0

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क
चालतांना तसेच बसल्यावर तीव्र वेदना होणे, झोपणेही कठीण होणे यासारख्या वेदनांनी त्रस्त होवून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आलेल्या एक तरुण व एक प्रौढ रुग्णावर सुप्रसिद्ध डॉ.दिपक अग्रवाल यांनी सिरॅमिक हेड वापरुन खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेच्या दुसर्याच दिवशी डॉक्टरांनी रुग्णाला स्वत:च्या पायावरही उभे केले.

दैनंदिन जीवनात उठणे, बसणे, चालणे यासारख्या महत्त्वाच्या क्रिया या खुब्याच्या सांध्याशी निगडित असतात. हा सांधा कंबरेचे हाड आणि मांडीचे हाड यापासून बनलेला असतो. त्याला दुखापत झाल्यास किंवा रक्तपुरवठा सुरळीत होत नसल्यास खुबा खराब होतो आणि सांध्यांमध्ये वेदना होणे, सूज येणे, चालताना लंगडणे, चालणे, उठणे, बसणे या क्रियांवर नियंत्रण येणे अशा समस्या रुग्णांना उद्भवतात. त्यावर हिप रिप्लेसमेंट केले जाते आणि हि शस्त्रक्रिया डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात अल्पदरात केली जाते.त्यामुळे रुग्णांना मुंबई-पुणे जाण्याची आवश्यकता भासत नाही. नुकतच बुलढाणा येथील २९ वर्षीय तरुण व आकोट येथील ५५ वर्षीय प्रौढाला खुबा खराब झाल्यामुळे प्रचंड वेदनांचा सामोरा करावा लागला. स्थानिक डॉक्टरांद्वारे तात्पुरता औषधोपचार घेतला. तात्पुरता त्रास कमी होवून पुन्हा तीव्र वेदना होत होत्या. त्यांनी रुग्णालयात येवून डॉ.दिपक अग्रवाल यांची भेट घेतली असता एमआरआय करण्याचा सल्ला दिला. त्याद्वारे खुबा खराब झाला असून खुबा प्रत्यारोपण करावे लागेल.रुग्णांच्या संमतीने डॉ.अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया केली असून दुसर्याचदिवशी रुग्णांना त्यांच्या पायावर उभे केले तसेच चालण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच सिरॅमिक हेड हे उच्च दर्जाचे इम्प्लांट असून रुग्णांना दिर्घकाळ त्याचा फायदा होतो.

सिरॅमिक हेड इम्पलांटमुळे झीज कमीतरुणांमध्ये हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेत जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीचा सिरॅमिक हेड इम्प्लांट वापरल्याचे अनेक फायदे आहे. यामुळे घर्षण कमी होवून टाकलेल्या बॉलचे पर्यायी सांध्याचे आयुष्य वाढते. या शस्त्रक्रियेमुळे लगेचच दैनंदिन हालचाली करणेही सुलभ होते.
– डॉ.दिपक अग्रवाल, विभागप्रमुख, अस्थिरोग
रिव्हीजन आर्थ्रोप्लास्टी फेलोशिप (जर्मनी)

Leave A Reply

Your email address will not be published.