सामाजिक कार्याबद्दल गोदावरी फाउंडेशनचा गौरव

0

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क
महिलांच्या आरोग्यविषयक जागृतीसाठी भुसावळ स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त लेडीज इक्वलिटी रन चे आयोजन करण्यात येते. यावर्षी हे आयोजन १२ मार्च रोजी करण्यात आले आहे. या इक्वलिटी रन च्या टी-शर्ट आणि पदक चे अनावरण आज भुसावळ येथे करण्यात आले. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक गोदावरी फाउंडेशन, जळगाव हे आहेत.

गोदावरी फाउंडेशनच्या महिला जागृतीसाठी आणि समाजसेवेसाठी देण्यात येणार्‍या योगदानाबद्दल नुकताच गोदावरी फाउंडेशनच्या सन्मान पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आला. हा सन्मान गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांनी स्वीकारला. या कार्यक्रमास डॉ.केतकीताई पाटील ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या अनावरणाच्या कार्यक्रमांमध्ये पोलीस अधीक्षक एम राजकुमार, राम्या कनन, डॉ.केतकीताई पाटील आणि प्रा.प्रवीण फालक यांनी महिला जागृती विषयी आपले मनोगत व्यक्त केले. हे अनावरण जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, त्यांच्या सुविद्य पत्नी राम्या कनन, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.वाघचौरे, असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.प्रवीण फालक, भुसावळ रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर श्री अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी असोसिएशनचे संचालक प्रा. प्रवीण पाटील, डॉ.चारुलता पाटील, डॉ.नीलिमा नेहेते, डॉ.तुषार पाटील, गणसिंग पाटील, ब्रिजेश लाहोटी, पुनम भंगाळे, सचिन अग्रवाल आणि भुसावळ परिसरातील अनेक धावपटू यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.