मनवेल येथे उष्मघाताने महिलेच्या मृत्यू

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क 

वाढत्या तापमानामुळे  शेतात काम करुन घरी आल्यावर  महिलेच्या उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना २३ मे रोजी दुपारी घडल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.

बेबाबाई मोहन बोरणारे (वय ७० ) ही महिला स्वतःच्या शेतात दगडी शिवारात मुलगा, सून यांना घेऊन शेतात कापुस लागवड करण्यासाठी काडी कचरा वेचत  होते. अचानक वाढत्या तापमानाचा फटका बसल्याने काम सोडुन घरी आली व अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मयत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, सुन, नातवंड असा परीवार असून २४ मे शुक्रवारी सकाळी ९ वाजता मनवेल येथे अत्यंस्कार करण्यात येणार आहे. मोहन मोतीराम बोरनारे यांच्या पत्नी तर विजय बोरनारे यांच्या आई होत.

Leave A Reply

Your email address will not be published.