सत्ता संघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागणार

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क
उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागणार असल्याचे सरन्यायाधिशांनी म्हटले आहे.
शिवसेना पक्षाच्या नावाबाबत आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयावरच पुढील निर्णय घ्यावेत, असा महत्त्वाचा युक्तिवाद आजच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. . पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार आयोगाला असल्याचा दावाही करण्यात आला.
उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेच्या मालकीसह अनेक मुद्यांवरून सुरू असलेल्या सत्ता संघर्षातील एक मोठी बातमी समोर आली असून याचा युक्तिवाद याच आठवड्यात संपवून निकालदेखील लवकरच मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हे वक्तव्य केले आहे.

ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षाबाबत आज सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अर्थात शिवसेना खटल्याचा निकाल याच आठवड्यात संपवायचा आहे. सत्तासंघर्षाचा निकाल हाती येण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक असल्याचं म्हटलं जातंय. कोर्टात आज ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि त्यानंतर देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. लंच ब्रेकनंतरही कामत यांचा युक्तिवाद सुरु राहील. त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवादाला सुरुवात करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.