अंगणवाडी सेविकांसाठी गोड बातमी…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत. अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. यासंबधी आता महत्वाची बातमी समोर येत असून अंगणवाडी सेवाकांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा झाली आहे.

दरम्यान, मानधन, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा अशा मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी २० फेब्रुवारीपासून संप सुरु केला होता. आज सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

यामध्ये सरकारसोबत झालेल्या बैठकीत अंगणवाडी सेविकांना दिड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार, मात्र त्यात कर्मचाऱ्यांच्या व सरकार यांच्या सहभागाने ती होणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार असल्याचेही या बैठकीत ठरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.