‘आरोग्यम्’ इन्स्टिट्युट ऑफ एन्शीयंट नॉलेजची सुरुवात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव येथील डॉ. अविनाश कुळकर्णी यांची वास्तु आरोग्यम ही संस्था सन 2000 साली स्थापन झाली. स्थापनेपासून संस्थेने आजतागायत देशातील व विदेशातील सुमारे 70 हजार विद्याथ्यांना शिकवून त्यांना चागल्या अर्थार्जनाला सुरुवात करून दिलेली आहे. डॉ. अविनाश कुळकर्णी यांनी वास्तु आरोग्यम संस्थेची सुरुवात करून हे छोटेसे रोपटे लावले होते. या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून संपूर्ण भारतात 45 शाखासह विदेशातील 8 शाखांमध्ये हा वृक्ष विस्तीर्ण झाला आहे. अनेक समाधानी वास्तु ग्राहकांच्या मनात घर करणारे वास्तु आरोग्यमचा जगभरात नावलौकीक आहे. भारतासह विदेशातही डॉ. कुलकर्णी यांनी योगा, जिओपॅथीक स्ट्रेस, ग्रास्तु विज्ञान, ऊर्जा विज्ञान, ज्योतिष यासह अनेक विषयावर टॉक शो करून मार्गदर्शन, केलेले आहे.

हे सर्व घडत असताना सरांच्या कन्या सौ. आकांक्षा कुळकर्णी यांना वास्तु बद्दलचे बाळकडू घरातूनच मिळत होते. त्या स्वत ऊर्जा विज्ञान या विषयात पीएचडी करीत आहेत. त्यांनी वडिलांचा वास्तुशास्त्राचा वारसा सांभाळत वास्तु आरोग्यमच्या सोईओ पदाची जबाबदारी स्विकारली आहे. त्या स्वतः देखील विदेशातील प्रदर्शनात भेट देऊन यास्तु शास्त्राबद्दल व प्राचिन भारतीय विज्ञानाबद्दल माहिती देऊन तेथील लोकांच्या वास्तु समृद्ध व सुखी करत आहेत, पुढील महिन्यात दुबई येथे होऊ घातलेल्या प्रदर्शनात त्या सहभागी होऊन प्राचिन भारतीय वास्तु संस्कृतीचे महत्त्व विषट करणार आहेत. त्या स्वत: सर्टिफाइड डाऊझर व इंटरनॅशनल ट्रेनर देखील आहेत.

हे सर्व करत असतांना डॉ. कुळकर्णी यांचे दिव्य स्वप्न म्हणजे आपले भारतीय संस्कृतीचे शिक्षणाचे आपण विदेशातून प्रमाणपत्र मिळविण्यापेक्षा आपल्या देशातच आपण हे को कर संकत नाही या दृष्टीने विचार करत सरांनी गेल्या महिन्यातच आरोग्यम् इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेजची सुरुवात केली. या इन्स्टिट्यूटमध्ये सरांनी आधुनिक उपकरण च प्राचिन भारतीय संस्कृतीची सांगड घालून नविन उपक्रम सुरु केला आधुनिक विज्ञानात त्यांनी ऊर्जेचे मोजमाप करण्यासाठी, डिझाईन तयार करणाया लागणाऱ्या सॉफ्टवेअर सोबतच अनेक बाबींचा समावेश करून त्यावर उपचार करण्यासाठी प्राचिन भारतीय संस्कृतीची मदत घेत विनतम अभ्यासक्रमाची मांडणी केली त्यात आटोकेंड सारख्या असंख्य सॉफ्टवेअरची गणना केली जाऊ शकते.

(डिप्लोमा इन वास्तु एनर्जी सायन्सेस, डिप्लोमा इन ऑस्ट्रोलॉजी डिप्लोमा इन स्पिरियालिटी डिप्लोमा बिल्डींग बायोलॉजिस्ट, डिप्लोमा इन जेमॉलॉजी यासह अनेक डिप्लोमा कोर्सेसची आरोग्यम् इन्स्टिट्यूट ऑफ एसीयंट नॉलेजच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना तरबेज करून त्यांना भारतीय प्राचित विज्ञान व आधुनिक विज्ञान यांची सांगड घालत उपचार पद्धती भारतीय प्राचिन विज्ञानाप्रमाणे करून वास्तु कशी समृद्ध करता येईल याचे शिक्षण दिले जाईल,

आटोकेंड पंचांग परिचय, संस्कृत भाषा, पारंपारीक वैदिक वास्तु, डाऊजिंग, वास्तु सिद्धांत प्लान बनविणे व त्याचे अवलोकन करणे यासोबतच भारतीय प्राचिन ग्रंथाची भव्य अशी लायब्ररी या सुविधासोबत अनेक सुविधा याद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असून यात लेखा परीक्षा, प्रात्यक्षिके, वास्तु व्हिजीट प्रात्यक्षिके यासह अनेक फायदे या आरोग्यम् इन्स्टिट्युट ऑफ एन्शीयट नॉलेज मधून विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.