बिग ब्रेकिंग; दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा राजीनामा मंजूर…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया(Manish Sisodia) आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. (Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia and Health Minister Satyendar Jain have resigned as ministers.) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे. (Chief Minister Arvind Kejriwal has accepted the resignation of both)

दोन दिवसांपूर्वी मनिष सिसोदिया यांना ताब्यात घेतले होते. मनीष सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारच्या 33 पैकी 18 विभागांची जबाबदारी होती. सत्येंद्र जैन नऊ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणात मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यापासून विरोधी पक्षांनी केजरीवाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.

तसेच तुरुंगात असतानाही सत्येंद्र जैन हे आरोग्यमंत्री पदावर होते. या दोघांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी म्हटले आहे की, यामुळे काम थांबणार नाही आणि भाजप आपल्या योजनेत यशस्वी होणार नाही.

मनिष सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री होते. याशिवाय अबकारी खातेही त्यांच्याकडे होते. सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारचे एकूण ८ विभाग होते. त्यांना ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे अटकेनंतर तब्बल ९ महिन्यांनी सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.