हृदयद्रावक; दहावीचा पेपर द्यायला निघाले… मात्र, वाटेत काळानं हेरलं…

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

सिन्नर घोटी हायवेवर आगासखिंड शिवारात सकाळी दहा वाजेच्या सुमारास एचपी गॅस टँकर आणि अॅक्टिवा यांच्यात भीषण अपघात होऊन दोन शाळकरी मुलांचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिन्नर शहराजवळील पांढुर्ली येथे परीक्षा केंद्रावर मराठीचा पहिला पेपर देण्यासाठी जात असताना दोन मित्राचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आज पहिला मराठीचा पेपर होता. हाच पेपर देण्यासाठी आगासखिंड येथील दोन विद्यार्थी पांढुर्ली येथे परीक्षा केंद्र असल्याने तिकडे निघाले होते. गावाच्या काही अंतर पुढे गेल्यावर डीएड कॉलेजसमोर त्यांची गाडी गॅस टँकरला धडकली आणि त्यात शुभम रामदास बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे हे दोन मित्र पांढुर्ली येथील जनता विद्यालय येथे आज (2 मार्च) आपल्या अॅक्टिव्हा या दुचाकीवरुन जात असताना आगासखिंड येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एच पी गॅसचा टँकरने धडक दिल्यामुळे या दोघांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. नाशिक (Nashik) ते सिन्नर तसेच सिन्नर-शिर्डी हायवे हा अपघाताला (Accident) सातत्याने निमंत्रण देणारा ठरत आहे. काही महिन्यांपूर्वीच सिन्नरच्या मोहदरी घाटात पाच मित्राचा अपघाती मृत्यू झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.