Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक; क्रूर मातेने घेतला तीन वर्षाच्या मुलीचा जीव…
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक; क्रूर मातेने घेतला तीन वर्षाच्या मुलीचा जीव…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 6, 2023Updated:March 6, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    आई आणि बाळाचे नातं कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. आईची माया काय असते आणि ती तिच्या लेकरांसाठी कुठल्या हद्दीपर्यंत पोहोचेल याची सीमा नसते. मात्र एका आई ने आपल्या व तिच्या प्रियकराच्या आड येणाऱ्या आपल्याच पोटच्या मुलीला जीवे मारल्याचे धक्कादायक कृत्य समोर आले आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने आईने प्रियकराच्या मदतीने मुलीचा खून केला आहे. या घटनेच्या तपासानंतर मुलीच्या आईसह प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे. खडकी पोलिसांना तीन दिवसांपूर्वी तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. गावातून पुण्यास पळून जाताना रेल्वेप्रवासातच मुलीला गळा दाबून संपवल्याचे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट झाले आहे.

    लक्ष्मी संतोष गवई (26) व संतोष देवमन जामनिक (25) दोघे रा.खेरपुडी, ता.बाळापूर, जि.अकोला अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सदर दोन्ही आरोपींवर खडकी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

    आरोपी लक्ष्मी व संतोष हे अकोला जिल्हयातील एकाच गावचे रहिवासी असून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. गाव सोडून पुण्यास जाण्याचे त्यांनी ठरवले होते. एक मार्च रोजी ते गावातून पुण्यास येण्याकरता निघाले. परंतु, लक्ष्मीने येताना तिच्या सोबत तीन वर्षाची मुलगी आणल्याने रेल्वे प्रवासात त्यांच्यात भांडणे झाली. आरोपीने त्यावेळी मुलीस पट्टयाने मारहाण करत तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर खडकी रेल्वे स्टेशन जवळील मोकळया मैदानात जाऊन मुलीचा मृतदेह टाकून ते पसार झाले होते.

    दोन मार्च रोजी पोलिसांना खडकी रेल्वे स्टेशन ते खडबी बाजार यादरम्यानच्या रस्त्यावर सीएफडी मैदानाजवळ तीन वर्षाचा मुलीचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. डॉक्टरांच्या अहवालानुसार मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

    मुलगी अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. पुणे- मुंबई जुन्या महामार्गावर पोलिसांना एका दुकानात आरोपींबाबत सीसीटीव्ही फूटेज मिळाले. त्यानुसार एक जोडपे सीसीटीव्हीत कैद झाले होते. महिलेच्या कडेवर संबंधित मुलगी होती आणि ते खडकी रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडत होते. हे जोडपे अकोल्यातून आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    #crime #maharashtra #mother #murder #police Mother's love affair pune
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif