जळगावात विद्यार्थ्याचा मोबाईल लांबविणारा अटकेत !

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
दुचाकीवरून आलेल्या भामट्यानी रस्त्याने पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोबाईल घेऊन पोबारा केल्याचा प्रकार २८ रोजी घडला असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. गिरीश रतन कोळी वय 42 रा. भादली ता. जळगाव असे अटक केलेल्या भामट्याने नाव आहे. नाव आहे.

तालुक्यातील भादली येथील रहिवाशी युगल जगदीश रडे वय १९ हा विद्यार्थी शिक्षणासाठी जळगाव शहरातील आंबेडकर मार्केट जवळ असलेल्या विवेकानंद नगर येथे राहतो तो मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरून जात असताना, दुचाकीवरून गिरीश रतन कोळी वय ४२ याने युगलचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. या घटनेनंतर युगल रडे याने जिल्हापेठ तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन मोबाईल चोरणारा संशयित गिरीश कोळी यास जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख या करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.