बोदवडमधून शेतकऱ्याची सव्वा दोन लाखांची रोकड लंपास

0

बोदवड , लोकशाही न्यूज नेटवर्क

दुचाकीने जाणाऱ्या वृद्धाला आवाज देऊन बाबा तुमचे खाली पैसे पडले आहेत असे सांगत तीन भामट्यानी २ लाख १६ हजारांची रोकड असलेली पिशवी लंपास करून पोबारा केल्याचा प्रकार बोदवड शहरात घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील राजूर येथे राहणारे प्रभाकर धर्मा लुटे (वय-५९) शेती करीत असून १ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते बोदवड शहराजवळील खंडेलवाल गॅस एजन्सी जवळ दुचाकीने जात असताना रस्त्याने जाणाऱ्या अज्ञात तीन भामट्यांनी बाबा तुमचे पैसे पडले आहे, असे सांगितल्यामुळे प्रभाकर लुटे हे पैसे खरेच तर पडले नाहीत ना यासाठी थांबले असता त्यांच्या मागून अज्ञात दोन व्यक्ती यांनी प्रभाकर यांची नजर चुकवून त्यांच्या दुचाकीला लावलेली २ लाख १६ हजार रुपये ठेवलेली पिशवी लांबविली. हा प्रकार घडल्यानंतर प्रभाकर लुटे यांनी आरडाओरड केल्याचा उपयोग झाला नाही . रोकड घेऊन भामट्यानी पलायन केले. लुटे यांनी बोदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून ३ संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलीस नाईक प्रमोद तायडे पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.