Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मोरगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा ; १६ जुगाऱ्यांना अटक
    गुन्हे वार्ता

    मोरगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा ; १६ जुगाऱ्यांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 6, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; एलसीबीची कारवाई

    जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ६ मार्च रोजी रावेर तालुक्यातील मोरगाव येथे बेकायदेशीर सुरू असलेलया जुगार अड्ड्यावर पहाटे ४ वाजता छापा टाकून सुमारे ५५ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच १६ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, रावेर तालुक्यातील मोरगाव येथे बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी ६ मार्च रोजी पहाटे ४ वाजता धडक कारवाई करून छापा टाकला. प्रल्हाद पुंडलीक पाटील यांच्या घराच्या आत वॉल कंम्पाउड मध्ये हा जुगार खेळ सुरू होता. पोलीसांनी धडक कारवाई केली. यावेळी अचानक पोलीस आल्याचे दिसतात जुगारी पळवाट दिसेल तिकडे पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करुन १७ जणांना ताब्यात घेतले.

    यांना झाली अटक
    यात संदीप दिनकरराव देशमुख (वय-४८) रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर, संजय दर्शन गुप्ता, शांताराम जीवराम मंगळकर, रा. लालबाग, मध्यप्रदेश, समधान काशिनाथ कोळी रा. सांगवा ता. रावेर, कासम महेबुब तडवी रा. पिंप्री ता. रावेर, जितेंद्र सुभाष पाटील रा. विवरा ता. रावेर , कैलास नारायण भाई रा. भाईवाडा ता. रावेर, मनोज दत्तू पाटील रा. पिंप्री ता. मुक्ताईनगर, मनोज अनाराम सोळंखे रा. आलमगंज बऱ्हाणपूर, सुधिर गोपालदास तुलसानी रा. बऱ्हाणपूर, रविंद्र काशिनाथ महाजन रा. वाघोदा ता. रावेर, बापु मका ठेलारी ता. पुर्णाड ता. मुक्ताइ्रनगर, राजू सुकदेव काळे रा. बऱ्हाणपूर, युवराज चिंधू ठाकरे रा. रावेर, सोपान एकनाथ महाजन रा.बऱ्हाणपूर, प्रल्हा पुंडलिक पाटील रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर यांच्यासह इतरांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पोलीसांनी १ लाख ४६ हजारांची रोकड, ८ चारचाकी वाहने, ६ दुचाकी असा एकुण ५५ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यांचा कारवाईत सहभाग

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अमोल देवढे, सहाय्यक फौजदार रवि नरवाडे, युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ कमलाकर बागुल, महेश महाजन, संतोष मायकल, किरण धनगर, श्रीकृष्ण देशमुख, भारत पाटील, प्रमोद ठाकूर तसेच रावेर पोलीस ठाण्याचे पोउनि बाळासाहेब नवले, पो.कॉ. समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, सचिन घुगे यांच्यासह आदींनी कारवाई केली आहे.

    #crime Lcb Jalgaon morgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif