जागतिक महिला दिनानिमीत्‍त भव्य रॅलीचे आयोजन

0

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क

वैदयकिय शिक्षण विभागाच्या निर्देशनानुसार व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापिठाच्या रोप्य महोत्सव वर्षानिमीत्‍त जागतिक महिला दिनानिमीत्‍त दि ८ मार्च रोजी स्तन कँन्सर जनजागृती व उपचारावर भव्य रॅलीचे जळगावात आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली ८ मार्च रोजी सकाळी ८ वा. भाउचे उदयान येथून सुरूवात होवून आकाशवाणी चौक पर्यत व परत भाउचे उदयान येथे समारोप होणार आहे.रॅलीमध्ये डॉ. उल्हास पाटील वैदयकिय महाविदयालय जळगाव, शासकिय आयुर्वेदीक महाविदयालय जळगाव, शासकिय वैदयकिय महाविदयालय जळगाव, डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथी महाविदयालय जळगाव, चामुंडामाता होमीओपॅथी महाविदयालय, इकरा युनानी महाविदयालय जळगाव इ. महाविदयालयाचे विदयार्थी व प्राध्यापक सहभागी होणार आहे.सदर रॅली समन्वयक डॉ. राजेश कोलारकर, डॉ. दिलीप ढेकळे,डॉ संगिता गावित याच्या मार्गदर्शना खाली होणार असून जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.