संशयित दहशतवादी सरफराज मेमनला पोलिसांनी केली अटक

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
संशयित दहशतवादी सरफराज मेमनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती एनआयए ने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना याबाबत माहिती पुरवली होती. एनआयएने माहितीच्या आधारे इंदूर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतलं आहे. सरफराजच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली आहे.

सरफराज मेमन हा चीन आणि पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेऊन भारतात आल्याची माहिती एनआयए ने दिली होती. या माहितीच्या आधारे एनआयए ने पोलिसांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं होते. एनआयएच्या माहितीच्या आधारे मुंबई पोलीस, एटीएस तसेच इतर यंत्रणाकडून तपास सुरु होता, आता त्यामध्ये यश आलं असून पोलिसांनी संशयित सरफराज मेमनला ताब्यात घेतलं आहे.

एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा ई-मेल पाठवण्यात आला होता. त्यानुसार, तपास यंत्रणाकडून तपास सुरु होता. संबंधित संशयित इसम सरफराजला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली असून त्यांची चौकशी करण्यात येईल. महाराष्ट्र एटीएस संशयित सरफराज मेमनची चौकशी करणार आहे.

मुंबईत फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती इंदूरची राहणारी असून या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतली आहे, अशी माहिती NIA ने मेलद्वारे पोलिसांना दिली होती. एनआयकडून मुंबई पोलिसांना करण्यात आलेल्या ई-मेलमध्ये या संशयित व्यक्तीची कागदपत्रंही पाठवली होती. त्याचा तपास सुरु होता.

Leave A Reply

Your email address will not be published.