सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव अगदी मातीमोल झाले होते. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडला होता. कष्ट करून पिकवलेला कांदा कवडीच्या भावात विकला जात होता. त्यामुळे बळीराजाला अश्रू अनावर झाले. दरम्यान, हाच मुद्दा विरोधकांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लावून धरला. या मुद्द्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), यांच्यासह विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण करताना, राज्यातील सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. सभागृहातील भावना आणि शेतकऱ्यांच्या कांद्याची परिस्थिती आपल्या लक्षात आली आहे. शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार आहे. म्हणून आम्ही निकर्ष आणि नियम डावलून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत सरकारपूर्णपणे पाठीशी उभं आहे. आता नाफेडनं कांदा खरेदी सुरू केली आहे. ज्या ठिकाणी खरेदी सुरू झाली नसेल ती सुरू केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात बोलताना दिलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.