पेपर देऊन घरी परततांना दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत…

0

 

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

पंढरपूर तालुक्यातल्या करकंब जवळच्या बार्डी रोडवर दहावीचा पेपर देऊन घरी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत भयानक अपघात घडला आहे. या अपघातामुळे पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राधा नागनाथ आवटे ही विद्यार्थिनी दहावीची परीक्षा देऊन घरी जात होती, तेव्हा तिच्या अंगावर जळणारं झाड पडलं.

16 वर्षांची राधा नागनाथ आवटे बादलकोटची राहणारी होती. दहावीचा पेपर संपल्यानंतर राधा तिचा भाऊ संदीप याच्या सोबत मोटारसायकल वरून ढेकळेवाडीला नातेवाईकांकडे जात होती. बार्डी रोड वरील एमएसईबी कार्यालयाच्या पुढे रस्त्याच्या बाजूला असलेलं पेटलेलं झाड राधाच्या अंगावर पडलं, त्यामध्ये राधाच्या डोक्याला जोराचा मार लागला. अपघातानंतर राधाला करकंब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारापूर्वीच राधाचा मृत्यू झाला. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या झाडाला नेमकी आग कशी लागली, याचा तपास यंत्रणा करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here