समृद्धी महामार्गावर भीषण अपघात 3 जण जागीच ठार

0

छत्रपती संभाजीनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क

ट्रक आणि कारच्या या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.अनिल राठोड आणि भाग्यश्री राठोड असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. तर त्यांच्या मुलाचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर लासुर स्टेशन येथे हडस पिंपळगाव जवळ शिर्डीहून नागपूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारणे समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. यात पती-पत्नी आणि एक लहान मुलगा जागीच ठार झाला तर दोन मुले जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दोन जण जखमी कारने ट्रकला पाठिमागून धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पती-पत्नी आणि मुलगा जागीच ठार झाला आहे. अनिल राठोड आणि भाग्यश्री राठोड असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. तर त्यांच्या मुलाचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये अख्ख कुटुंबचं संपल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.