संजय राऊत यांच्या हक्क भंग प्रस्तावावर ८ मार्चला निर्णय

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

संजय राऊत यांच्या विधानावरुन प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने सभागृह तहकूब करण्यात आले. संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्क भंग प्रस्तावावर ८ मार्चला निर्णय होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकेचा भडीमार करत आहे. आज त्यांनी कोल्हापूर येथे माध्यमांसोबत संवाद साधताना महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ, असं म्हणत शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला. त्यावरुन सभागृहात चांगलाच गदारोळ झाला.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. या मुद्द्यावरून चार वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

मात्र, या विषयावर सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या उज्वल परंपरेचा अपमान केला आहे. सभागृहाचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे दोन दिवसात चौकशी करून सभागृहात ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे अध्यक्ष यांनी जाहीर केले.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.