श्री. मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी मांगलिक वधू- वर परिचय पत्रिकेची सुविधा

0

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील श्री मंगळग्रह मंदिरात कुंडलीत मंगळयोग असलेल्या विवाहेच्छुक वधू वरांचा परिचय पत्रिकेच्या मान्यवरांच्या हस्ते २१ रोजी शुभारंभ करण्यात आला.
ज्या मुला-मुलींच्या विवाह कार्यात अडथळा येतो,मनासारखे विवाह योग जुळत नाहीत,असे भाविक मोठ्या संख्येने अभिषेकसाठी येतात. कुंडलीत मंगळ योग असलेल्या वधू वरांचे विवाहकार्य जुळून येण्यासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेच्यावतीने अभिषेकसाठी आलेल्या व मंगळयोग असलेल्या वधू वरांकडून नाव,जन्म तारीख,जन्मस्थळ,वय,शिक्षण, व्यवसाय,गोत्र,आई वडीलांसह अन्य नातेवाईकांची माहिती भरून घेतली जात आहे. पहिल्या दिवशी या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भविष्यात मांगलिक असलेल्या बहुतांश जाती – धर्मियांतील वधू वरांची माहिती मंगळग्रह मंदिरात उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ प्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस.बी. बाविस्कर, उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सहसचिव दिलीप बहिरम,विश्वस्त अनिल अहिरराव आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.