पाचोऱ्यात रक्तदान करुन वाचविले बाळंतिणीचे प्राण

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे केव्हा कुणाला रक्ताची गरज पडु शकेल हे सांगणे कठीण आहे. पाचोरा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महीलेचे रात्री दोन वाजेच्या सुमारास रक्तदान करुन वाचविणाऱ्या रक्तदात्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

दिवसभर कधीही रक्त मिळणे हे सहज शक्य आहे. मात्र अंत्यत दुर्मिळ रक्तगट ओ निगेटिव्ह आणि तेही रात्रीच्या सुमारास मिळेल याची कधीच शाश्वती नसते अशातच भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील छाया गायकवाड ही माता बाळंतपणासाठी येथील लिलावती हॉस्पिटल ला दाखल झाली. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि रुग्णा सोबत कुणीही नाही अशात तिला रक्ताची आणि तोही दुर्मिळ रक्तगटाची गरज पडली . तेव्हा हॉस्पिटल प्रशासनापुढे रक्त कसे मिळेल याचा प्रश्न पडला . मात्र यादरम्यान कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याशी रात्री दिड वाजेच्या सुमारास संपर्क केला असता त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये उपस्थिती देऊन संपर्कातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला . रात्री दोन वाजता सामाजिक कार्यकर्ते सुनिल माळी यांच्याशी संपर्क करून त्यांनी लगेच येऊन रक्तदान केले. रक्तदानाने छाया गायकवाड यांचा जीव हा डॉ. वैभव सुर्यवंशी वाचवु शकले . आणि त्या मातेची सुखरूप प्रसूती होऊन तिने बाळाला जन्म दिला. यावेळी सचिन पाटील, ललित पाटील, शुभम मराठे उपस्थिती होते. छाया गायकवाड यांच्या नातेवाईकांनी कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या सह रक्तदाते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.