मार्च महिन्यात ‘इतके’ दिवस राहणार बॅंका बंद ; RBI ची सुट्ट्यांची यादी पहा

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
नुकतीच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) मार्च २०२३ मधील सुट्ट्यांबाबतची माहिती प्रसारित केली आहे. मार्च महिन्यामध्ये एकूण १२ दिवस बॅंका बंद असणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये सणउत्सव यांसह दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातील शनिवार तसेच प्रत्येक आठवड्यातील रविवार यांचा समावेश करण्यात आला आहे. कारण मार्चमध्ये १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. अन्यथा तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो.

अशा आहेत सुट्ट्या

३ मार्च (शुक्रवार) – चपचार कुट – मिझोराममध्ये बँका बंद राहतील

५ मार्च – रविवार

७ मार्च (मंगळवार) – होळी / होलिका दहन / धुळीवंदन / डोल जत्रा – महाराष्ट्र, आसाम, राजस्थान, श्रीनगर, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू, श्रीनगर, तेलंगणा आणि झारखंडमध्ये बँका बंद आहेत.

८ मार्च (बुधवार) – होळी / होळी २रा दिवस – धुलेती / याओसांग दुसरा दिवस: त्रिपुरा, गुजरात, मिझोरम, मध्यप्रदेश, ओडिसा, चंदीगड, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, बेंगा येथे बँका बंद राहतील

९ मार्च – गुरुवार – (होळी) – बिहारमध्ये बँका बंद

११ मार्च – महिन्याचा दुसरा शनिवार

१२ मार्च – रविवार

१९ मार्च – रविवार

२२ मार्च – (बुधवार) – गुढी पाडवा / उगादी सण / बिहार दिवस / साजिबू नोंगमापनबा (चेरोबा) / तेलुगु नववर्ष दिन / पहिला नवरात्र – महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, गोवा, बिहार आणि श्रीनगर या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

२५ मार्च – चौथा रविवार

२६ मार्च – रविवार

३० मार्च – श्री राम नवमी

दरम्यान बँका बंद असल्या तरी बँकेच्या बहुतांश सेवा ऑनलाईन उपलब्ध असल्याने ग्राहकांना कोणतीही अडचण येत नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.