रवींद्र जडेजाचा नवा विक्रम; वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीत योगदान देण्यात अपयशी ठरला. मात्र त्याने गोलंदाजी करताना भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रेवीस हेडला (Travis Head) अवघ्या १२ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

इंदूरच्या मैदानावर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्ठात आला आहे. दरम्यान भारतीय संघाकडून पहिल्या डावात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या रवींद्र जडेजाच्या नावे एका मोठा विक्रमाची नोंद झाली आहे.

जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० धावा करणारा आणि ५०० गडी बाद करणारा तो दुसराच भारतीय खेळाडू ठरलाय. यापूर्वी केवळ कपिल देव यांना हा कारनामा करता आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here