पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
पारोळा येथे एका वृद्धाला दोन चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरट्यांनी वृद्धाकडील तीस हजार रुपये लंपास केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आमडद तालुका जिल्हा धुळे येथील मेंढी पालनाचा व्यवसाय करणारे नाना बाळू धनगर (५५) हे मेंढ्या विकून साठ हजार घेऊन घरी जात होते. तत्पूर्वी त्यांनी पारोळा येथील सराफकडे आपले गहाण ठेवलेले चांदीचे कडे सतरा हजार रुपये देऊन सोडवले व एरंडोल कडे जाण्यासाठी पारोळा बस स्थानकाकडे दुपारी साडेबाराच्या सुमारास आले. यावेळी बस स्थानकात चालत असताना एका पल्सर गाडीवर दोन अज्ञात तरुण आले आणि त्यांना तुमच्याकडे गांजा आहे, आणि त्यामुळे तुमची झडती घ्यायची आहे, असे म्हणाले, यावर वृद्धाने त्याच्या खिशातून तीस हजार रुपयांचे बंडल काढून दाखवले. यानंतर क्षणातच चोरटे ते घेऊन फरार झाले. मात्र वृद्धा जवळ असलेले तेरा हजार रुपये रोख व चांदीचे कडे मधल्या खिश्यात असल्याने सुखरूप राहिले. मेंढी व्यवसायातून कष्टाचा कमवलेला पैसा गेल्याने वृद्धाला रडू कोसळले घाबरलेल्या वृद्धाच्या तोंडातून काही क्षण आवाज निघत नव्हता यावेळी इतरांनी व उपस्थित होमगार्ड यांनी वृद्धास विचारपूस केली असता, त्यांनी झालेली आपबीती सांगितली. याबाबत पारोळा पोलीस शोध मोहिम चालू आहे. वृद्धांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस करीत आहे